शेतकरी आंदोलन : सध्याची स्थिती कायम राहणे चांगले नाही; शरद पवारांचा इशारा

Sharad Pawar

दिल्ली :- दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची मोदी सरकारने गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. सध्या जी परिस्थिती उद्भवली आहे ती कायम राहिल्यास देशासाठी चांगलं नसेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वोसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्र सरकारला दिला.

पवार म्हणाले, मला वाटते यावर चर्चेद्वारे तोडगा काढला जाऊ शकतो. मी असेही ऐकले आहे की, आंदोलनादरम्यान चार ते पाच जणांनी आत्महत्या केल्या. अशा प्रकारची परिस्थिती उद्भवत असेल तर हे देशासाठी चांगले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER