शेतकरी आंदोलन : केंद्राने पवारांशी चर्चा केली असती तर ही वेळ आली नसती

नागपूर :- मोदी सरकारच्या (Modi Govt) नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कृषी कायद्यांविरोधात शेतकरी दोन महिन्यांपासून आंदोलने करत आहेत. आता ही लढाई दिल्लीच्या अगदी जवळ येऊन पोहोचली आहे, गेल्या ४ दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर बसलेले आहेत. त्यांची मागणी जंतर मंतरवर आंदोलन करण्याची आहे. रविवारचा दिवस शेतकरी आंदोलनामुळे खूप व्यस्त होता. शेतकऱ्यांनी बुराडी जाण्यासाठी नकार देत दिल्ली जाम करण्याचा इशारा दिला आहे. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) प्रतिक्रिया दिली आहे.

पटेल म्हणाले की, शेतकर्‍यांचे आंदोलन रोखण्यासाठी नवीन कृषी कायदे बनविण्याच्या संदर्भात माजी कृषिमंत्री शरद पवार (Sharad Pawar), पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल आणि माजी पंतप्रधान एच. देवेगौडा यांच्याशी चर्चा करायला हवी होती. त्यांनी कृषी क्षेत्रात मोठे काम केले आहे. त्यांचा सल्ला घेतला असता तर आज ही वेळ नसती.

पटेल म्हणाले की, ‘शेतकऱ्यांचे आंदोलन केंद्र सरकारचे अपयश आहे. नवीन कायदा आणण्यापूर्वी सरकारने शेतकऱ्यांशी बोलून दोनदा विचार करायला हवा होता. केंद्राने पवार, बादल आणि देवेगौडा यांच्याशी बोलले पाहिजे. या नेत्यांनी कृषी क्षेत्रात काम केले आहे. या नेत्यांशी संपर्क साधल्यानंतर सरकारला नवीन कृषी कायदयात संशोधन करण्याची गरज भासली नसती. या मुद्द्यावरून विधेयकाला विरोध केला गेला नसता, असेही पटेल म्हणाले.

दरम्यान, दिल्लीमध्ये सत्ता असलेल्या आपनेही या आंदोलनात उडी घेतली असून शेतकऱ्यांना दिल्लीत आंदोलनाची परवानगी मिळावी अशी मागणी आपचे नेते राघव चढ्ढा य़ांनी केली आहे. याचबरोबर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी ट्विट करून, केंद्र सरकारने शेतकऱ्यांसोबत तातडीने बिनशर्त चर्चा करावी, अशी मागणी केली आहे.

ही बातमी पण वाचा : शेतकरी काय दहशतवादी आहेत का ? संजय राऊत संतापले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER