शेतकरी आंदोलन : शरद पवार, राहुल गांधींसह पाच नेते राष्ट्रपतींना उद्या भेटणार

Sharad Pawar & Rahul Gandhi & Ramnath Kovind

दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाबाबत मोदी सरकारवर दबाव आणण्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह पाच पक्षांचे नेते उद्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांची भेट घेणार आहेत.

डाव्या विचारांचे नेते सीताराम येचुरीही या नेत्यांसोबत राहणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना हे नेते उद्या संध्याकाळी पाच वाजता भेटणार आहेत. कोविड प्रोटोकॉल असल्याने पाच नेत्यांनाच भेटण्याची संमती राष्ट्रपतींनी दिली आहे.

सीताराम येचुरी म्हणालेत, कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या १३ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी कडाक्याच्या थंडीत आंदोलन करत आहेत. आज शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली होती. या बंदला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, डाव्या विचारांचे पक्ष, शिवसेना या सगळ्यांनी पाठिंबा दर्शवला. उद्या राष्ट्रपतींची भेट घेऊन कृषी कायद्यांवर तोडगा काढण्यासंबंधीची चर्चा करण्यात येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER