शेतकरी कर्जमाफी : आम्ही केले ते मोदी सरकारने केंद्रात करून दाखवावे- राहुल गांधी

rahul-gandhi

नवी दिल्ली :- शेतक-यांना कर्जमाफी देण्याचे वचन आम्ही मध्य प्रदेशात पूर्ण करून दाखविले असून आता मोदी सरकारने केंद्रातही याचप्रमाणे निर्णय घ्यावा, असे आवाहन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज येथे केले.

संसद भवनात ते पत्रकारांशी बोलत होते. गांधी म्हणाले, मोदी सरकारने डोळे बंद करून देशातील 15 उद्योगपतींना कर्ज दिले आहे. ज्यामध्ये अनिल अंबानी यांचाही समावेश आहे. मात्र गेल्या 4 वर्षांपासून मोदी सरकारने शेतक-यांयाबाबत कुठलाही निर्णय घेण्यात आला नसल्याचे ते म्हणाले.

आम्ही अवघ्या काही तासांतच हा निर्णय घेतला. जो मोदी मागील चार वर्षांत घेऊ शकले नाही. शेतक-यांचे कर्ज माफ केल्याशिवाय मोदींना शांतपणे झोपू देणार नाही असेही गांधी म्हणाले. त्यांनी राफेल लढाऊ विमानाचा मुद्दाही उजलून धरला. कर्जबाजारी शेतकरी तसेच सामान्य माणसांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करुन त्यांनी उद्योगपतींची बाजू उचलून धरण्याचे ते म्हणाले.

अनिल अंबानीसह मोदी सरकारने उतर 15 उद्योजकांचे 3.5 लाख कोटीचे कर्जमकारने माफ केले आहे. सामान्य जनता, छोटे दुकानदार आणि इतर गरीब लोक एकीकडे तर दुसरीकडे उद्योगपती असल्याचे ते म्हणाले.

राहुल गांधींनी आश्वासन दिले कि काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष त्यांच्या पाठिशी आहे. नोटबंदी हा जगातील सर्वात मोठा घोटाळा असून सरकारने जनता, छोटे दुकानदार आणि शेतक-यांच्या खिशातून पैसा लुटला असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

राफेल प्रकरणात सरकाने सर्वोच्च न्यायालयात शपथ पत्र सादर करताना काही त्रुटी राहून गेल्याचा सरकारचा दावा सरकार करत असल्याबाबत विचारले असता ते म्हणाले, राफेलच्या किमतीबाबत कॅगने लक्ष दिले पाहिजे आणि त्यांच्या अहवालावर लोकसभेच्या पब्लिक अकांउंटस कमेटीत चर्चा व्हायला हवी.
आम्ही संयुक्त संसदीय समिचीची मागणी केली आहे. भाजप सरकार लोकसभेच चर्चा करण्यापासून पळ काढत असल्याचे गांधी म्हणाले.

जेव्हा गांधी पत्रकारांशी बाहेर बोलत होते तेव्हा लोकसभेत आतमध्ये राफेल मुद्दावर गोंधळ सुरु होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर काँग्रेसने माफी मागावी, अशा आशयाचे फलक घेऊन सत्तारूढ पक्षाचे खासदार घोषणा देत होते.