‘ठाकरे’ सरकारकडून आनंदाची बातमी; शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर

CM Uddhav Thackeray

मुंबई : सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या एक दिवसापूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची यादी सोमवारी जाहीर करणार, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती. त्यानुसार ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. आज अहमदनगर जिल्ह्यातील पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जखणगाव व राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी या दोन गावांची यादी प्रसिद्ध झाली असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी दिली.

हि बातमी पण वाचा : कर्जमाफीचा दुसरा टप्पा मुख्यमंत्री लवकरच जाहीर करणार- बच्चू कडू

राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय जाहीर केला होता. कोणत्याही कागदपत्राविना सरसकट दोन लाखांपर्यंत कर्जमाफीचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. सोमवारी याद्या प्रसिद्ध होतील असे त्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार नगर जिल्ह्यातील शेतकरी या कर्जमाफीमध्ये पात्र होणार आहेत. पहिली यादी आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने जाहीर करण्यात आली. यामध्ये नगर तालुक्यातील जखणगाव राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी गावाचा समावेश आहे.  जखणगाव ११६ व ब्राह्मणी ८५६ अशा एकूण ९७२ शेतकऱ्यांच्या नावांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. राज्यातील एकूण १५ हजार ३५८ शेतकऱ्यांची यादी आजच जाहीर होणार असून, यात ६८ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेसाठी राज्यभरातील ३४ लाख ८३ हजार शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे.

दरम्यान, नगर जिल्ह्यामध्ये शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली असून जिल्हा सहकारी बँकेने प्रत्येक शाखेमध्ये कर्जदारांसाठी बायोमेट्रिक पद्धतीचा पहिल्यांदाच वापर केला आहे.

‘एनपीआर’ छाननीसाठी आघाडीच्या मंत्र्यांची समिती, मुख्यमंत्र्यांची घोषणा


Web Title : Farmers list of loan waiver announce by thackeray govt

(Maharashtra Today : Latest and breaking news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra in Marathi.)