शेतकरी आंदोलन : दिल्लीच्या सीमेवर तणाव, ट्रॅक्टर परेडसाठी बॅरिकेट्स तोडले

नवी दिल्ली :- केंद्र सरकारने (Center Govt) मंजूर केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात (Agriculture Law) दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेड (Farmers Tactor Rally) काढण्याचा निर्णय घेतला आहे. सुप्रीम कोर्टाने मध्यस्थी करण्यास नकार दिल्यानंतर दिल्ली पोलिसांनी मोर्च्याला  परवानगी दिली आहे. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून दिल्लीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या दरम्यान दिल्लीच्या दिशेने निघालेल्या हजारो शेतकऱ्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्टस तोडले आहेत. राजपथावरील संचलन पार पडल्यानंतर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यास शेतकऱ्यांना परवानगी आहे.

दिल्ली-हरियाणाच्या तिकरी बॉर्डरवर शेतकऱ्यांनी पोलिसांनी सुरक्षेसाठी उभारलेले बॅरिकेड्स तोडले. हे शेतकरी पंजाबमधील किसान मजदूर संघर्ष समितीचे असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. ‘संयुक्त किसान मोर्चा’ने  अद्याप मोर्च्यासाठी सुरुवात केलेली नाही. दरम्यान तिकरी बॉर्डरवर शेतकरी नेत्यांनी आंदोलकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. पोलिसांसोबत बैठक घेऊन आंदोलनाची वेळ ठरवली जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे.

तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून मार्गक्रमण करणाऱ्या मोर्च्यात २.५ लाख ट्रॅक्टरसह पाच लाख शेतकरी सहभागी होतील, असा दावा संयुक्त किसान मोर्चाने केला असला तरी, मोर्च्यात  फक्त पाच  हजार ट्रॅक्टर व तितक्याच संख्येने आंदोलकांच्या सहभागाची परवानगी दिल्ली पोलिसांनी दिली आहे. तीनही मोर्चे दुपारी १२ ते संध्याकाळी ५ या वेळेत काढले जाणार आहेत.

ही बातमी पण वाचा : हेच का आपले प्रजासत्ताक ? केंद्राने एक पाऊल मागे घेतले असते तर…सामनातून केंद्र सरकारवर आसूड

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER