कांदा निर्यात बंदीने साताऱ्यातील शेतकरी अडचणीत

Onion

सातारा : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातल्याने सातारा जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. वीस ते पंचवीस हजार रुपये क्विंटल असलेला कांदा निर्यात बंदी मुळे दहा ते पंधरा हजार प्रती क्विंटल रुपये इतका खाली येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. गेले काही आठवडे कांदा बाजारात कांद्याचे दर अवघे 1500 ते 2000 रुपये क्विंटल इतके कमी निघत असताना केंद्राने कशासाठी कांदा निर्यात बंदी केली? असा सवाल शेतकरी करत आहेत.

साताऱ्यातील लोणंद कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यातील प्रमुख कांदा बाजारपेठ असून या कांदा बाजारात खंडाळा, फलटण, माण, पुरंदर आदी तालुक्यांतील शेतकरी आपला कांदा विक्रीसाठी आणत असतो. या शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणित कांदा या नगदी पिकावर अवलंबून असते. कांदा उत्पादक शेतकरी कधीच फायद्यात गेलेला दिसून आला नाही. मात्र, त्याचा फायदा व्यापाऱ्यांना व दलालांना होत असतो. सध्या बाजारात कांद्याचे दर सरासरी दिड हजार रूपये क्विंटल म्हणजे पंधरा रुपये किलो असताना शेतकऱ्यांना त्यापासुन नक्की काय फायदा मिळत आहे? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांचा कांदा उत्पादन खर्चही निघत नाही, असे असताना केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी नक्की कशासाठी घातली? असा सवाल शेतकरी वर्गातुन केला जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER