सुपारीचं पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी उभारली देशातली तिसरी सर्वात मोठी चॉकलेट कंपनी !

Chocolate - Maharastra Today

तुम्हाला कोणतं चॉकलेट आवडतं डेअरी मिल्क, पर्क की किटकॅट. कोणत्या ब्रँडच आइस्क्रिम तुम्ही जास्त खाता, वाडीलाल, अमूल की बास्किन रॉबिंस? चॉकलेट बिस्कीटमध्ये तुम्हाला हाइट अँड सिक आवडतं की बॉर्बन? तुमचं उत्तर काहीही असो. यातलं सर्वोत्तम काय या वादात आपल्याला पडायचं नाहीये. सांगायचं फक्त इतकंय की या सर्व उत्पादनात एकाच कंपनीनं बनवलेलं चॉकलेट वापरलं जातं. ‘सामग्री सेंट्रल ऐरेका नट मार्केटिंग अँड प्रोसेसिंग कोऑपरेटीव्ह’ म्हणजेच ‘कॅम्पको.’ या कंपनीची गोष्ट जरा हटके आहे. सुपारी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांमुळं भारतीयांपर्यंत दर्जेदार चॉकलेट पोहचतंय.

भारतात कॅम्पको चांगलीच प्रसिद्ध आहे. कॅडबरी, आणि नेस्लेच्यानंतर ही कंपनी भारतातली तिसरी सर्वात मोठी चॉकलेट उत्पादक कंपनी आहे. चॉकलेट अधारित जितकेही उत्पादनं भारतात आहेत त्यापैकी ८० टक्के उत्पादनात कॅम्पकोचं चॉकलेट वापरलं जातं. ही कंपनी मंगळुरपासून ५२ किलोमीटर अंतरावर कोर्नडकामध्ये आहे. १९७३ साली सुपारी उत्पादक शेतकऱ्यांच्या एका गटानं या कंपनीचा पाया रोवला होता.

शेतकऱ्यांची फॅक्टरी

शेतकरी एकत्रिकरणाचा उद्देश्य ठेऊन कॅम्पको कंपनी बाजारात आली. विदेशातील कंपन्यांनी भारतात येऊन लुट माजवू नये. शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसै शेतकऱ्यांना मिळावेत या विचारानं शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी कॉम्पको कंपनीचा पाया रोवला. या कंपनीनं अनेक शेतकऱ्यांच भविष्य सुरक्षित केलं आणि सोबतच कामगारांच सुद्धा. ही कंपनी सुपारी व्यवसायातून प्रति वर्ष १८०० कोटी रुपयांची तर चॉकलेट निर्मितीतून ३०० कोटी रुपयांची उलाढाल करते.

१९७० च्या दशकात, अमूल आणि कॅडबरी चॉकलेट बनवण्याच्या व्यवसायात उतरले. १९७९ पर्यंत चॉकलेट बनवण्यासाठी लागणाऱ्या ‘कोको’ची किंमत १३. ६५ रुपयांवरुन घटून ५.३० रुपये प्रतिकिलो झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातदेखील किंमती ढासळल्या आणि कंपन्यांनी शेतकऱ्यांकडून कोको खरेदी करणं बंद केलं. तेव्हा शेतकऱ्यांच नुकसान टाळण्यासाठी सुपारी उत्पादक कॉम्पको कंपनीनं कोको खरेदी करण्याचा निर्णय घेतला. १९८० ते ८५ या काळात कंपनीन ३३७ टन कोको खरेदी केला. शेतकऱ्याचं नुकसान तर टळलं पण कॅम्पकोकडून कुणीच कोको खरेदी करायला तयार नव्हतं. तेव्हा कंपनीनं स्वतःच चॉकलेट बनवण्याचा निर्णय घेतला.

आंतरराष्ट्रीय चॉकलेट कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी त्यांना प्रशिक्षणाची गरज होती. त्यासाठी देशभरातून तज्ञ बोलवण्यात आले. १९८६ साली त्यांनी चॉकलेट युनिटची स्थापना केली. त्यांच्या जवळ असणारे कोको हे ब्राझील, घाना आणि इतर कोको उत्पादन करणाऱ्या देशातील कोकोंच्या तोडीस तोड होते. त्यांनी चॉकलेट बनवण्यासाठी सुरु केलेलं युनिट दक्षिण आशियातलं सर्वात मोठं युनिट बनलं.

सुरुवातीच्या दिवसांमध्ये मोठ्या संघर्षाला तोंड द्यावं लागलं. आंतरराष्ट्रीय बाजारातील चढउतार त्यांना माहिती नव्हते. कठिण काळ होता पण माघार घेणं हा पर्याय शिल्लक नव्हता. अधुनिक तंत्रज्ञान, वित्तीय सहाय्यता, गुणवत्तापुर्ण कच्चा माल या सर्व गोष्टी एकत्रित आल्यामुळं ते या संघर्षात टिकू शकले.

प्रत्येक चॉक्लेटमध्ये कॅम्पको

१९९४ मध्ये कॅम्पकोनं कोको लोणी, चॉको मास आणि चॉकलेट कंपाउंड बनवून विकायला सुरुवात केली. चॉकलेट बनवणाऱ्या अनेक कंपन्यांसाठी या गोष्टी कच्चा माल म्हणून वापरल्या जातात. अमूल, ब्रिटानीया, आय.टी.सी., युनिबिक, पार्ले, कॅडबरी आणि हार्शिजसहित लॉट इत्यादी कंपनय्या चॉकलेट आणि चॉकलेट चिप्सची खरेदी कॅम्पकोकडून करतात. कारखान्यात प्रतिवर्षी ५० कोको उत्पादनं बनतात. कंपपनीचा कॅम्पको बार, मेल्टो, क्रिम आणि टर्बो नावानं स्वतःचे चॉकलेट ब्रँड्सही बाजारात उलब्ध आहेत.

शेतकऱ्यांच हित कंपनीनं सर्वोतोपरी ठेवलं. वेळप्रसंगी स्वतः नुकसान झालेलं पण शेतकऱ्यांना याची झळ पोहचू दिली नाही. २०१२ ते १०२५ या काळात कंपनीसमोर असंच एक संकट आलं होतं. जेव्हा कोकोच्या किंमती ४० ते ५० रुपये प्रतिकिलो असायला हव्या होत्या तेव्हा त्या ३५ रुपयांवर घसरल्या पण कंपनीनं शेतकऱ्यांना ५० ते ५५ रुपये प्रतिकिलोनं बील अदा केले होते.

शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण हेच कंपनीपुढील उद्दिष्ट आहे. कपाउंड चॉकलेटऐवजी शुद्ध चॉकलेट बनवण्यावर कंपनी आता भर देते आहे. कंपनीन जैविक बॉयलर बसवलेत. यामध्ये जैविक इंधनाचा वापर केला जातो. जीवाश्म इंधनाचा वापर टाळल्यामुळं कंपनी दरवर्षी १.२ कोटी रुपयांची बचत करते. भारतीय शेतकऱ्यांच्या प्रगतीशिवाय देश प्रगती करु शकत नाही. कॅम्पको कंपनीनं ही गोष्ट शेतकऱ्यांच्या प्रगतीबरोबर स्वतःची प्रगती साधत सिद्ध करुन दाखवलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button