शेतकऱ्यांचे ‘चक्का जाम’: महाराष्ट्रात अनेक ठिकाणी निदर्शने

Farmers Chakka Jam

मुंबई : दिल्ली येथे केंद्राच्या कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात संयुक्त किसान मोर्चाच्या आवाहनावरून देशभरात चक्का जाम आंदोलन आले. महाराष्ट्रात विविध ठिकाणी निदर्शने झालीत.

कोल्हापूर : राजू शेट्टींना ताब्यात घेतले

कोल्हापूरात स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. केंद्र सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या. पोलिसांनी राजू शेट्टी यांना ताब्यात घेतले.

सरकारचे समर्थन करणाऱ्या सेलिब्रेटींवर टीका करताना राजू शेट्टी म्हणाले की, सेलिब्रिटी हे सरकारचे लाभधारक आहेत म्हणून ते टिव्ह-टिव्ह करत आहेत. पण त्यांनी लक्षात ठेवावे, तुमची सेलिब्रिटी बिरुदावली ही कोट्यवधी लोकांच्या जीवावर आणि प्रेमावर तयार झाली आहे. तुम्ही स्वार्थासाठी सरकारची बाजू घेणार असाल तर तुमचं तुणतुणं बंद होईल आणि तुम्हाला कुत्रं सुध्दा विचारणार नाही.

धुंदलवाडी

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गवार धुंदलवाडी येथे आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली माकपाने रास्ता रोको केले. वर्धा ते नागपूर मार्गावर पवनार येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात पवनार येथे काही काळ रस्ता धरला रोखण्यात आला. सुमारे अर्धा तास वाहतूक विस्कळीत झाली होती.

पुणे

पुण्यात शेतकरी बचाव संयुक्त कृती समितीतर्फे आंदोलन करण्यात आले. हडपसर आणि पुणे-सोलापूर रस्त्यावरही आंदोलन करण्यात आले. कृषी कायदे रद्द करण्यासाठी घोषणा देण्यात आल्यात.

निफाड

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या नेतृत्वाखाली निफाड येथील नाशिक-औरंगाबाद महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला.

बुलढाणा

जिल्र्ह्यात स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांना काल मध्यरात्री पोलिसांनी स्थानबद्ध केले. स्वाभिमानीतर्फे रेल्वे रोको करण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यांतर शेगाव शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. दिल्लीतील

लातूर

शहरात येणाऱ्या चार मुख्य रस्त्यावर चक्का जाम करण्यात आला. याचा फटका एसटी महामंडळाला बसला असून पुढील आदेश येईपर्यंत वाहतूक बंद करण्यात आली आहे.

परभणी

परभणीत दोन ठिकाणी रस्ता रोको करण्यात आले. परभणी-गंगाखेड महामार्गावरील पिंगळगढ नाल्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून तर पोखर्णी फाटा येथे शेतकरी सुकाणू समितीने आंदोलन केले. या दोन्ही आंदोलनामुळे परभणी-गंगाखेड महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER