अजित पवारांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; शेती विधेयक महाराष्ट्रात लागू होणार नाही

farmers-bill-andlabour-reforms-bill--wont-be-implemented-in-maharashtra-ajit-pawar

मुंबई : महाराष्ट्रासह विविध राज्यांत निदर्शने होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) शुक्रवारी म्हणाले की, राज्यात शेती विधेयक व कामगार सुधारणांचे बिल (Labour-reforms-bill) लागू होणार नाही. पुण्यातील पत्रकारांशी बोलताना पवार यांनी हा निर्णय जाहीर केला.

हे कायदे घाईघाईत मंजूर झाले आहेत. त्यामुळे आम्ही सध्या कायदेशीर बाबींचा अभ्यास करत आहोत. हे विधेयके राज्यात लागू होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आज शेती विधेयकांच्या विरोधात शेतकरी संघटनांनी राज्यासह देशात मोठे आंदोलन सुरू केले आहे. शुक्रवारी शिरोळ येथे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या निवासस्थानासमोर केंद्र शासनाचा निषेध व्यक्त करीत नव्या विधेयकाची होळी करण्यात आली.

लोकशाहीतील सगळे संकेत पायदळी तुडवून केंद्र सरकारने संसदेमध्ये विधेयक मंजूर केले. शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य संपविणारे हे विधेयक असून केंद्र सरकार त्याची अंमलबजावणी करू शकणार नाही. भविष्यात तुमच्या कार्पोरेट कंपन्यांच्या काचा असतील; मात्र आमच्या हातात दगड असतील. हा अन्याय सहन करणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.

ही बातमी पण वाचा : शिवसेनेने आघाडी धर्म पाळला ; नगरमध्ये राष्ट्रवादीने बाजी मारली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER