शेतकऱ्यांचा संयम सुटत चालला आहे : राजू शेट्टी

Raju Shetti

नवी दिल्ली :- दिल्ली येथे सुरू असलेले आंदोलन हे पंजाब, उत्तरप्रदेश व उत्तराखंड राज्याचे नसून संपुर्ण देश काश्मीर पासून ते कन्याकुमारीपर्यंत या आंदोलनात सहभागी झाला आहे. शेतकऱ्यांचा संयम सुटत चालला आहे. त्यामुळे देश अशांत झाल्याशिवाय राहणार नाही आणि एकदा देश अशांत झाला तर कोणालाही कारभार करता येणे अवघड होईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी गाजीपूर बाॅर्डर दिल्ली येथील किसान आंदोलनात दिला.

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने संपुर्ण देशभर आंदोलन जोर धरू लागले आहे. केंद्र सरकारने मनाचा मोठेपणा दाखवावा. शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय आणि त्यांना मान्य नसलेले जे कायदे आहेत, ते मागे घ्यावे. हमीभाव कायदेशीर करावा, हाच यावरचा पर्याय आहे. शेतकरी ज्या हमीभावाच्या कायद्याची मागणी करत आहे तो कायदा न आणता ज्या कायद्यांमध्ये शेतकर्यांची लुट होईल तो कायदा केंद्र सरकार वारंवार शेतकऱ्यांच्या भल्याचे कायदे असल्याचे सांगत आहे. जर हे कायदे शेतकऱ्यांच्या भल्याचे असते तर देशात सुरू असलेल्या या आंदोलनात एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झाले नसते, असेही राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER