नुकसान लाखोंचं झालं, मात्र मुख्यमंत्र्यांनी दिले फक्त ३ हजार ८०० रुपये; शेतकरी संतप्त

CM Uddhav Thackeray

सोलापूर : परतीच्य पावसाने सर्वात मोठं नुकसान शेतकऱ्यांच झालं आहे, अतिवृष्टीमुळे अनेकांच्या शेतजमिनीत पाणी शिरले, पूरामुळे जनावरांचा चारा वाहून गेला, घरं कोसळली, शेतकऱ्यांवर डोंगराएवढं संकट कोसळलं, यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालं.त्यामुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) काल सोलापूरचा दौरा केला.

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या दौऱ्यात काही शेतकऱ्यांना मदतीसाठी धनादेशाचे वाटप करण्यात आले होते. पावसाने शेतकऱ्यांचे सर्वकाही हिरावून घेतलं, सोलापूरच्या रामपूरमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या हाती केवळ ३ हजार ८०० रुपयांचा चेक दिला आहे. लहान लेकरं उपाशी बसलेत, धान्य वाहून गेले आहे, ३-४ लाखांचे नुकसान झालं, एवढा तरी चेक कशाला दिलाय? तुमचा चेक घेऊन जा अशा शब्दात शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केली आहे.

दरम्यान, परतीच्या पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेकडो गावे उद्ध्वस्त झाली आहेत. जिल्ह्यातील ६२३ गावे जलमय झाली असून ८६०८ कुटुंबे स्थलांतरित झाली आहेत. एकूण ३२ हजार ५२१ नागरिकांनी जिल्हा परिषद शाळा, साखर कारखाना तसेच विविध धार्मिक मठांचा आसरा घेतला आहे. ५८ हजार ५८१ हेक्टरवरील पिकांचे जबरदस्त नुकसान झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER