शेतकरी आंदोलन हिंसक वळण : सुप्रीम कोर्टात याचिका

Farmers Protest Delhi - Supreme Court

नवी दिल्ली : ट्रॅक्टर रॅली (Tractor Rally) काढण्याच्या नावाखाली देशाची राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) प्रजासत्ताक दिनी (Republic Day) प्रचंड हिंसाचार घडवून आणण्यात आला होता. या प्रकरणाची सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निवृत्त न्यायमूर्तीच्या नेतृत्वाखालील आयोगामार्फत चौकशी केली जावी, अशा विनंतीची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे.

दिल्लीत दंगा घडवून आणणारे लोक तसेच संघटनांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश संबंधित तपास संस्थाना दिले जावेत, असेही याचिकाकर्ते वकील विशाल तिवारी यांनी याचिकेत म्हटले आहे. हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी २२ गुन्हे दाखल केले असून आतापर्यंत २०० लोकांना अटक करण्यात आली आहे. हिंसाचारात ३०० पोलिस जखमी झाले आहेत.

सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्तीच्या नेतृत्वाखालील आयोगामार्फत दिल्ली हिंसाचाराची चौकशी केली जावी. ३ सदस्यीय आयोगात इतर २ सदस्य उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती असावेत. याशिवाय आयोगाला निर्धारित कालावधीत अहवाल देण्याची अट घातली जावी, असेही तिवारी यांनी याचिकेत नमूद केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER