
दिल्ली : कृषी कायदा तयार करण्याबाबत केंद्र सरकारने आमचा सल्ला ऐकला नाही. त्यामुळे या कायद्यांबद्दल पेच निर्माण झाला, अशी प्रतिक्रिया केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरुद्ध दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत राष्ट्रवादीचे (NCP) नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिली.
ते म्हणाले, सरकारने विधेयक मंजूर करायला घाई केल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. आम्ही याबाबत सरकारला सांगत होतो, मात्र आमचे ऐकले नाही. पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी गहू आणि तांदळाचे मुख्य उत्पादक आहेत. हेच शेतकरी आज कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. यावर लवकरात लवकर तोडगा काढला गेला नाही तर देशभरातील शेतकरी त्यांच्यासोबत असतील.
कृषी विधेयके मंजूर केली जात होती. तेव्हा आम्ही सरकारला म्हटले होते की, घाई करू नका. या विधेयकांना लोकसभेच्या निवड समितीकडे पाठवा, यावर चर्चेची आवश्यकता आहे. मात्र, सरकारने आमचे ऐकले नाही आणि घाईत विधेयक मंजूर करण्यात आले. आता सरकारला त्या घाई-गडबडीची फळं भोगावी लागत आहेत, असे पवार म्हणालेत.
When Bill was being passed, we’d requested govt that they shouldn’t be in a hurry, it should be sent to Select Committee & a discussion is needed, but that didn’t happen and the Bill was passed in haste. Now govt is facing problems because of that haste: Sharad Pawar, NCP Chief https://t.co/fZg7LaXSrU
— ANI (@ANI) December 6, 2020
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला