शेतकरी आंदोलन : सरकारच्या समर्थनाचे ट्विट केल्यामुळे सुनील शेट्टीच्या मुलांना धमकी !

Farmers' agitation- Sunil Shetty's children threatened for tweeting support to government!

मुंबई : भारतातील शेतकरी आंदोलनाला रिहाना, मिया खलीफा, ग्रेटा थनबर्ग आदी इंटरनॅशनल सेलिब्रिटींनी पाठिंबा दिल्यानंतर केंद्र सरकारने ‘इंडिया टुगेदर’ ही मोहीम सुरू केली. अनेक भारतीय सेलिब्रिटींनी सरकारची ही मोहीम  उचलून धरली. फिल्म इंडस्ट्रीतून सरकारच्या बाजूने सर्वप्रथम मैदानात उतरला तो बॉलिवूडचा ‘अण्णा’ अर्थात सुनील शेट्टी (Sunil Shetty). त्याने सरकारला पाठिंबा  देत ट्विट केले. शेतकरी आंदोलन समर्थकांनी सुनील शेट्टीला ट्रोल करणे सुरू केले. त्याला शेतकरीविरोधी ठरवले. त्याच्या मुलांना ट्विटरवर धमक्या दिल्या.

 यावर आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत सुनील शेट्टी म्हणाला, मी शेतकरीविरोधी आहे, असे म्हणणे निव्वळ आहे. एका ट्विटमुळे लोकांनी मला शेतकरीविरोधी ठरवले, याचे मला दु:ख आहे. माझ्या आवाक्यात असते तर असे म्हणणाऱ्या  प्रत्येकाला मी पकडले असते. शेतक-यांसोबत माझ्या भावना जोडलेल्या आहेत. माझे पूर्वज शेतकरी होते.

मी एका छोट्याशा गावातून आलो आहे. आजही दरवर्षी चारदा माझ्या गावात जातो. मी कोणत्याही राजकीय पार्टीशी संबंधित नाही. मला जे वाटले तेच मी बोललो. शेतकरी आंदोलनाचा मुद्दा सौहार्दपणे निकाली काढा, इतकेच मी म्हणालो. यावरूनही मला ट्रोल केले जाते! मी एक अभिनेता आहे. काहीही बोललो तरी ट्रोल होतो. म्हणून मी बोलावे की नाही? माझ्यामुळे माझ्या मुलांना सोशल मीडियावर धमक्या दिल्या जात आहेत. का? मी काय चूक केली? असा प्रश्न शेट्टीने केला.

सुनील शेट्टीचे ट्विट

शेतकरी आंदोलनावर हॉलिवूड पॉप सिंगर रिहाना व इतर इंटरनॅशनल सेलिब्रिटींनी ट्विट  केल्यानंतर सुनील शेट्टीने सरकारच्या बाजूने ट्विट केले होते – प्रत्येक गोष्टीबद्दल कायम व्यापक दृष्टिकोन ठेवायला हवा. कारण अर्धसत्यापेक्षा घातक दुसरे काहीही नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER