शेतकरी आंदोलन : ६ फेब्रुवारीला देशव्यापी ‘चक्का जाम’ – राकेश टिकैत

rakesh tikait

दिल्ली :  केंद्राच्या कृषी कायद्यांच्या विरोधात ६ फेब्रुवारीला देशव्यापी ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणा भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी केली. या कायद्यांविरुद्ध जनजागृतीसाठी मोहीम राबवू, असे ते म्हणालेत.

जोपर्यंत कायदा मागे घेत नाही तोपर्यंत घरवापसी नाही, अशी घोषणा पुन्हा त्यांनी दिली. शेतकरी आंदोलन ऑक्टोबरच्या आधी संपणार नाही, असेही ते म्हणालेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिल्ली-उत्तरप्रदेश सीमेवर गाझीपूर येथे टिकैत यांनी भेट घेतली.

शेतकरी आंदोलनाला शिवसेनेचा जाहीर पाठिंबा असल्याचे सांगितले. संजय राऊत यांच्या भेटीबाबत बोलताना राकेश टिकैत म्हणालेत, विरोधक येऊन आम्हाला पाठिंबा देत असतील तर त्यात काही अडचण नाही. पण त्यांनी याचे राजकारण करू नये. कोणी नेते भेटायला येत असतील तर आम्ही काहीच करू शकत नाही.

सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करते आहे, त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य आहे, असा आदेश शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी आम्हा सर्व खासदारांना दिला, असे संजय राऊत यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER