दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन हिंसक

Farmer-Protest

दिल्ली :- केंद्राच्या कृषी कायद्यांच्या (Agriculture Law) विरोधात दिल्लीत आंदोलन करणाऱ्या काही शेतकरी संघटनांनी आज परवानगी नसलेल्या भागात ट्रॅक्टर रॅली (Tractor Rally) काढण्याचा प्रयत्न केल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागले. हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीहल्ला केला आणि अश्रुधुराचा वापर केला. निदर्शकांनी पोलिसांचे अडथळे तोडून मयूर विहार भागात घुसण्याचा प्रयत्न केला. आयटीओ भागातही निदर्शक हिंसक झाले होते. पोलिसांवर दगडफेक करून त्यांची वाहने पेटवून दिली. एके ठिकाणी निदर्शकांनी तलवारी उपसल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता.

निदर्शक लाल किल्ला आणि राजपथकडे घुसण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी मात्र मला कुठल्याही हिंसक घटनेची माहिती मिळाली नाही. आमचा मार्च शांततेत सुरू आहे, असे सांगितले.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER