शेतकरी आंदोलन : चर्चा फिस्कटली तर संसदेला घेराव करण्याचा इशारा

- आजच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष

Farmer Movement

दिल्ली :- केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात आठवडाभरापासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. सरकारसोबत चर्चाही सुरू आहे. आतापर्यंत चार फेऱ्या पार पडल्या, चारही वेळा चर्चा फिस्कटली. आज पुन्हा चर्चा होणार आहे, ही फिस्कटली तर संसदेला घेरण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. केंद्र सरकार व शेतकऱ्यांमध्ये आतापर्यंत चार वेळा चर्चा झाली, तोडगा निघाला नाही. आज दुपारी चर्चेची पाचवी फेरी होणार आहे. सरकारने मागण्या मान्य केल्या नाही, तर संसेदला घेराव घालू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

ही बातमी पण वाचा : शेतकरी आंदोलनाला ३६ ब्रिटिश खासदारांचा पाठिंबा; युकेच्या सचिवांना लिहिले पत्र

दरम्यान, आज होणाऱ्या बैठकीपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, वाणिज्य मंत्री पीयूष गोयल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या घरी दाखल झाले आहेत. आज होणाऱ्या बैठकीसंदर्भात पंतप्रधानांसोबत चर्चा केली जाणार असून, त्यानंतर शेतकऱ्यांशी केंद्र सरकारचे शिष्टमंडळ चर्चा करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER