हेक्टरी ५० हजार नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन; रवी राणांसह कार्यकर्त्यांना अटक

Ravi Rana

अमरावती :- अतिवृष्टीमुळे पिकांचे खूप नुकसान झाले. या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या, लॉकडाऊनच्या काळात आलेलं वीज बिल माफ करा, या मागण्यांसाठी  आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. रवी राणा यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.

रवी राणा यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्ग सुमारे दोन तास रोखला होता. दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांना बळाचा वापर करत आंदोलन मोडून काढलं. निदर्शकांनी रस्त्यावर टायर जाळले. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जात असल्याने आम्हीही दिवाळी तुरुंगात साजरी करू, असा इशारा रवी राणा यांनी सरकारला दिला. रवी राणा यांचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी सरकारविरोधात घोषणा दिल्या.

अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या पाठीशी नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात आहे. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार केला. तरीही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळाली नाही. त्यामुळे रवी राणा यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन करण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER