
चंदीगड : दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे (Farmers protest) पडसाद हरियाणाच्या राजकारणात उमटायला सुरुवात झाली आहे. काँग्रेसने खट्टर सरकारविरोधात विधिमंडळात अविश्वास ठराव मांडण्याची घोषणा केली आहे (Congress Legislative party in Haryana take decision to put no-confidence motion in special session of Assembly).
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आज (शुक्रवारी) हरियाणातील काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. काँग्रेस विधिमंडळ पक्षाने विशेष अधिवेशन बोलावून सरकारविरोधात अविश्वासदर्शक ठराव मांडण्याचा निर्णय घेतला. सध्याची परिस्थिती पाहता खट्टर सरकारने जनता आणि विधानसभा दोहोंचा विश्वास गमावला आहे, असे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपिंदरसिंह हुड्डा म्हणालेत. शेतकऱ्यांबाबत मोठी चूक केल्यामुळे हरियाणा सरकार सध्या वाईट अवस्थेत आहे. शेतकऱ्यावर ‘वॉटर कॅनन’ने पाण्याचा मारा करणे, अश्रुधुराची नळकांडी फोडणे सरकारला टाळता आले नसते का? सरकारची ही कृती निषेधार्ह आहे. सरकारने शेतकऱ्यांचा अपमान केला आहे.
आंदोलक शेतकऱ्यांना ‘खलिस्तानी’ आणि ‘काँग्रेसी’ म्हणून हिणवण्यात आले. हे आंदोलन जात, पंथ आणि प्रदेश या सगळ्यापलीकडचे आहे. एवढ्या थंडीतही शेतकरी आंदोलन करत आहेत, असे भूपिंदरसिंह हुड्डा म्हणालेत. हरियाणात भाजपा आणि जननायक जनता पार्टी (JJP) यांचे संयुक्त सरकार आहे. जननायक जनता पार्टीचे दुष्यंत चौटाला यांनी यापूर्वीच भाजपाला इशारा दिला आहे की, शेतकऱ्यांच्या हमीभाव आणि इतर मागण्या मान्य करा; मागण्या मान्य केल्या नाही तर उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देईन.
Legislative party is of the view that a special session of Assembly be called to discuss issue of farmers. We’ll move a no-confidence motion as the current state govt has lost the confidence of people as well as the Vidhan Sabha: BS Hooda, former Haryana CM and Congress leader pic.twitter.com/rjo0kCxPzG
— ANI (@ANI) December 4, 2020
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला