
पालघर : दिल्ली येथे नव्या कृषी कायद्याविरोधातील शेतकरी आंदोलन आणखी तीव्र होत आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासासाठी देशासह राज्यात देखील अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. पालघरमध्येही केंद्र सरकारने लागू केलेल्याा नव्या कृषी कायद्याविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), जनता दल, माकप, कष्टकरी संघटना आदींसह जिल्ह्यातील विविध पक्ष, संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. जिल्ह्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात रास्ता रोको झाले आणि शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला.
पालघरमधील वाडा तालुक्यात एआयडीडब्ल्यूएच्या ५०० महिला सदस्यांनी तहसीलदार कार्यालयाकडे कूच केली. त्यांनी ‘हिटलर-विटलर नहीं चला तो तो मोदी-वोडी भी नहीं चलेगा’, ‘महिलाएं के अछि दिन कहां चले गये’ अशा घोषणा दिल्या.
एआयडीडब्ल्यूएचे अखिल भारतीय सरचिटणीस मरियम ढवळे यांनी स्पष्ट केले की, कृषी विधेयकाचा विपरित परिणाम शेती समुदायावर होतो, विशेषत: महिलांवर. “ग्रामीण भागातील महिला कामगारांपैकी सुमारे ७४ टक्के शेतीमध्ये कार्यरत आहेत. त्यापैकी केवळ १२..८ टक्के जमीन मालक आहेत. म्हणूनच, बहुतेक महिला शेतीतील न पाहिलेले कामगार’ आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला