अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच आर्थिक मदत मिळेल : बच्चू कडू

Bachchu Kadu

अमरावती : राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले . मात्र, राज्य सरकारने केवळ १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. मात्र काही तांत्रिक कारणामुळे या मदतीसाठी विलंब होत असल्याची माहिती राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.

दरम्यान ही मदत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच दिली जाईल, असेही बच्चू कडू (Bachchu Kadu) म्हणाले. राज्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. राज्यातील सत्ताधारी नेत्यांसह विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या नुकसानीची पाहणी केली. या नुकसानीच्या पाहणीनंतर शेतकऱ्यांच्या या दु:खावर फुंकर घालण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी १० हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.

मात्र १५ दिवस उलटूनही अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. त्यामुळे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळणार का? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. मात्र आता दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना मदत मिळेल असे संकेत बच्चू कडूंनी दिल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER