जयंत पाटलांच्या साखर कारखान्यासमोर आंदोलन करण्याआधीच शेतकरी आंदोलकांना अटक

Farmers arrested

मुंबई :- स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आज ८ मार्च रोजी राजारामनगर (साखराळे) येथील राजाराम बापू सहकारी साखर कारखाना येथे ठिय्या आंदोलन करण्यात येणार होते. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलनामध्ये सहभागी होण्याची शक्यता असणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. राज्यातील मंत्री असणाऱ्या जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या कारखान्यासमोर होणाऱ्या या आंदोलनाच्या आधीच कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्याने कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर पोलिसांनी पहाटेच स्वाभिमानी शेतकी संघटनेच्या वाळवा व पलूस तालुक्यांतील सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे आंदोलनाची वेळ सकाळी ११ ची होती तरी सहा तासआधी म्हणजेच पहाटे पाच वाजल्यापासून पोलिसांनी कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांना जबरदस्तीने ताब्यात घेतलं. या सर्व कार्यकर्त्यांना कासेगांव, इस्लामपूर, पलूस पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. या घटनेचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निषेध नोंदवण्यात आला आहे. मंत्र्यांच्या दबावाखाली पोलिसांनी धडपशाहीने कारवाई केल्याचाही आरोपही स्वाभिमानी शेतकरी संघटने केला आहे.

ही बातमी पण वाचा : ‘तेरे को का लगता था की नहीं लौटेंगे… गलत’; फडणवीसांना उद्देशून जयंत पाटलांचा दमदार व्हिडीओ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER