सोलापूरच्या शेतकरी नवरदेवाने नवरीला आणण्यासाठी पाठवले हेलिकॉप्टर !

farmer-groom-sent-helicopter-to-his-bride

सोलापूर :- सततचा  दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीमुळे मोठ्या संकटात सापडलेला ‘शेतकरी नवरा नको गं बाय’ अशी स्थिती असताना माढा तालुक्यात एका शेतकरी नवरदेवाने त्याच्या नववधूला घेण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर पाठवले होते.

उपळाई (बुद्रुक) येथील दीपक देशमुख यांची कन्या ऐश्वर्या हिचे शुभमंगल कासेगाव ता. पंढरपूर येथील नितीन बाबर या प्रगतशील शेतकरी मुलाशी आज (९ जून)  धुमधडाक्यात पार पडले.

हि बातमी पण वाचा : लग्नासाठी २०० हेलिकॉप्टर घेतली भाड्याने !

Farmer Groom-Helicopterनितीनचे शिक्षण एमबीएपर्यंत झाले आहे. तरीही तो आधुनिक पद्धतीने शेती करून भरघोस उत्पन्न घेतो. तर, ऐश्वर्याचेही कॉम्प्युटर इंजिनीअरिंगपर्यंत शिक्षण झाले आहे. शेतकरीदेखील कुठेही कमी नाही, हे दाखविण्यासाठी स्वतः शेती करणाऱ्या नितीनने आपल्या नववधूला घेऊन येण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर पाठवले . ग्रामीण भागात हेलिकॉप्टर म्हणजे कुतूहलाचा विषय असतो. ऐश्वर्याला सासरी पाठवण्यासाठी संपूर्ण गाव हेलिपॅडच्या ठिकाणी एकवटले होते. पोलिसांचा फौजफाटादेखील संरक्षणासाठी तितकाच होता. नववधूची अशा प्रकारे पाठवणी होत असल्याने हा विषय कुतूहलाचा आणि अख्ख्या  पंचक्रोशीत चर्चेचा ठरला.