पोलिसांच्या गोळीबारात नाही तर ट्रॅक्टर पलटी होऊन त्या शेतकऱ्याचा मृत्यू : सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज

Farmer Dies During Protest due to tractor overturned-cctv camera Footage

नवी दिल्ली : २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी (January 26-Republic Day) दिल्लीत घडलेली हिंसक घटनेनं जगभरात चर्चेचा विषय ठरलेली आहे. मागील दोन महिन्यांपासून पंजाब-हरियाणाच्या शेतकऱ्यांनी केंद्राने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन (Movement against agricultural laws) छेडलेले आहे. आतापर्यंत केंद्र आणि शेतकरी नेत्यांमध्ये ११ बैठका झाल्या. त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही म्हणून ठरल्याप्रमाणे काल शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली (Tractor rally) काढली आणि त्यांला हिंसक वळण लागले.

केंद्राने केलेल्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकरी आंदोलकांनी ट्रॅक्टर परेड आयोजित केली. हिंसक वळण लागले, त्यात दिल्लीतील आयटीओ येथे ट्रॅक्टर पलटी झाला आणि त्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रॅक्टर पलटी झाल्याने एका शेतक-याचा मृत्यू झाला आहे. संबंधित शेतकर्याने नियोजित मार्ग सोडून गाझीपूरच्या सीमेवरून प्रवेश करणाऱ्या अन्य शेतकऱ्यांसोबत तो आला होता. हा शेतकरी वेगाने ट्रॅक्टर चालवत होता, त्यामुळे नियंत्रण सुटून ट्रॅक्टर पलटी झाला आणि त्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला. अशी घटना घडली आहे. मात्र, पोलिसांनी शेतकऱ्यावर गोळी मारली म्हणून त्याचा मृत्यू झाला आहे, असा प्रचार करण्यात आला आहे, असे स्पष्टीकरण पोलिसांनी केले आहे.

मृत्यू पावलेल्या शेतकऱ्याचे नाव नवनीत सिंह असून तो उत्तरप्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील डिबडिबा गावातील आहे. त्याचं नुकतंच लग्न झालेलं होतं. परेडमध्ये हा ट्रॅक्टर सहभागी झाला होता. ट्रॅक्टर पलटी झाला आणि त्याखाली दबून त्याचा मृत्यू झाला आहे. सी. सी. कॅमेरा फुटेजमध्ये ही घटना उघड झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER