शेतकऱ्याची आत्महत्या : बोंड अळीचा आणखी एक बळी

farmer suicide

अमरावती : पश्चिम विदर्भात मागील १० महिन्यांत  ८०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. आता पुन्हा एकदा अमरावतीच्या ममदापूर या गावातील एका ५४ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या (Farmer Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

कपाशीला आलेली बोंड अळी पाहून नुकसान झाल्याने दिवाळी कशी साजरी करायची या आर्थिक विवंचनेतून या शेतकऱ्याने गळफास घेतला. देवराव सांभारे असे या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, देवराव सांभारे यांच्याकडे एकूण चार एकर शेती आहे. यामध्ये त्यांनी या वर्षी दोन एकर सोयाबीन आणि दोन एकर कपाशीची लागवड केली होती. यात खोडकिडा आणि परतीच्या पावसाने सोयाबीनचे नुकसान झाले.

त्यामुळे केवळ त्यांना तीन क्विंटल सोयाबीन झाले आणि तेही खराब झाले. त्यानंतर कपाशीवरही बोंड अळी आल्याने कपाशी पार सडली. शेतात लागवड केलेल्या दोन्ही पिकांचे नुकसान झाल्याचे पाहून त्याच्या हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. हाताची  दोन्ही पिके गेल्याने वर्षभराचा उदरनिर्वाह कसा करायचा; लोकांचे, पैसे बँकेचे कर्ज कसं फेडायचे ?अशा विविध संकटाच्या गर्तेत ते अडकून पडले होते. त्याच विवंचनेत थेट घरी येऊन गळफास लावत आत्महत्या केली. दिवाळी तोंडावर आली आहे.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या  आर्थिक पॅकेजची मदत अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे अनेक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. यामुळे काही शेतकरी अडचणीत सापडले आहेत. यामुळे सरकारने लवकरात लवकर मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER