आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या जालना बैठकीतच शेतक-याचा आत्महत्येचा प्रयत्न

Rajesh Tope - Farmer Suicide Attempt Jalna

जालना : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या जालना दौर्‍याच्या वेळी सोमवारी एका 42 वर्षीय शेतक-याने आत्महत्येचा प्रयत्न केला. सावकाराने जमीन हडपली असून यासंदर्भात वारंवार तक्रारी करून देखील महसूल आणि पोलीस प्रशासन काहीच कारवाई करत नसल्याने संतप्त झालेल्या या शेतकऱ्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयात राजेश टोपे यांच्या उपस्थितीत होत असलेल्या आढावा बैठकीदरम्यान विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विलास राठोड असं या शेतकऱ्याचा नाव असून तो सेवली शिवारातील पाथरूड गावाचा रहिवासी आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे जालना दौ-यावर येत असल्याचे कळाल्यानंतर अनेक शेतकरी टोपे यांच्यासमोर आपल्या समस्या मांडमार म्हणून त्यांची वाट पाहत होते. दुपारी साडेतीन वादेपर्यंत हे शेतकरी टोपेंच्या प्रतिक्षेत ताटकळत होते.

दरम्यान, आपल्या अडचणी कोणीच ऐकण्यास तयार नाहीत असा आक्रोश करत अखेर एक शेतकरी थेट जालना जिल्हाधिकारी कार्यलयात पोहचला व तेथे आरोग्यमंत्री टोपेंची बैटक सुरू असतानाच विष पिण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे प्रशासनदेखील हादरले.

त्या शेतकऱ्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून घटनेनन्तर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस लावण्यात आला आहे.

दरम्यान, पालकमंत्री राजेश टोपे यांच्यासमोर घडलेल्या या प्रकारामुळे प्रशासनाची चांगलीच अडचण झाली आहे. त्यामुळे आगामी काळात या शेतकऱ्याने ज्या कारणासाठी आपला जीव देण्याचा प्रयत्न केला, त्याबाबत सदर शेतकऱ्याला न्याय मिळणार का, हे पाहावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER