वहितीदाराने स्व:च्या आईला ट्रॅक्टर समोर ढकलले : गुन्हा दाखल

मालेगाव : स्वत:च्या आईलाच टँक्टरखाली ढकलणा-या इसमावर मालेगाव पोलीसांनी गुन्हा दाखल केला. जमिनीच्या मूळ मालकास पेरणी करता येऊ नये, यासाठी वहितीदाराने हा प्रकार केला.

मुळ शेतमालक महादेव लक्ष्मण राऊत यांनी कैलास दळवी यांना वहितीसाठी जमिन दिली होती दोघेही तालुक्यातील मुंगळा येथील रहिवाशी आहेत. परंतु ती जमिन कैलास दळवी राऊत यांना परत करीत नसल्याने राऊत यांनी सदर प्रकरणी तालुका न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाद मागितली. यामध्ये राऊत यांच्या बाजुने निकाल लागल्याने ते शेतात पेरणी करण्यास गेले असता दळवी आपल्या आईला घेऊन शेतात हजर झालेत. राऊत यांची पेरणी थांबविण्यासाठी स्वत:च्या आईला ट्रॅक्टरखाली ढकलले.

याप्रकरणी सरकारतर्फे मालेगाव पोलीसांत तक्रार देण्यात आली. मुंगळा येथील महिला पार्वताबाई दळवी हिला तिचा मुलगा कैलास दळवी व नातु अंकुश दळवी यांनी शेतीच्या वादावरुन ट्रॅक्टरखाली टाकले. या तक्रारीवरून पोलीसांनी त्या दोघांविरुध्द कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल केला. यामधील अंकुश दळवी याला पोलीसांनी अटक केली आहे. पुढील तपास मालेगाव पोलीस करीत आहेत.