फरान अख्तरचीही ओटीटीवर ‘तूफान’द्वारे एंट्री

Farhan Akhtar

थिएटरच्या तारखा अगोदरच मोठ्या नायकांनी बुक करून ठेवलेल्या असल्याने अनेक कलाकारांना त्यांचा सिनेमा थिएटरवर रिलीज करणे कठिण जात आहे. त्यामुळेच या कलाकारांनी ओटीटी प्लॅटफॉर्मची वाट धरली आहे. थिएटर सुरु झाले असले तरी ओटीटीवर नवे सिनेमे रिलीज करणे मात्र यामुळेच थांबलेले नाही. मोठ्या पडद्यावर हिट सिनेमे देणारा फरहान अख्तरही (Farhan Akhtar) आता त्याचा नवा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवरच रिलीज केला जाणार आहे. फरहानने मोठ्या पडद्यावर अभिनय तर केलाच आहे, त्याने सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शनही केले आहे. ओटीटीसाठी त्याने वेबसीरीजचीही निर्मिती केली आहे. मात्र आता प्रथमच त्याचा सिनेमाही ओटीटीवर येणार आहे.

प्राईम व्हीडियोसाठी फरहान अख्तरने ‘मिर्झापुर’ ही वेबसीरीज तयार केली होती. या वेबसीरीजने वादही निर्माण केले होेते. फरहान अख्तरच्या ओटीटीवर रिलीज होणाऱ्या या सिनेमाचे नाव ‘तूफान’ असून अमेझॉन प्राईमने बुधवारी या सिनमाच्या प्रीमियरची घोषणा केली. यासाठी अमेझॉनने तूफानचा पोस्टर रिलीज करीत 21 मे रोजी सिनेमा ओटीटी प्लेटफॉर्म वर उपलब्ध केला जाईल अशी घोषणा केली. पोस्टरसोबत अमेझॉनने लिहिले आहे, उन्हाळाच्या दिवसात वेधशाळेची भविष्यवाणी. एपिक ब्लॉकबस्टर ‘तूफान’ प्राइम वर. या सिनेमाचा टीझर 12 मार्च रोजी रिलीज केला जाणार आहे. तूफान सिनेमात फरहान अख्तरने एका बॉक्सरची भूमिका साकारली असून याचे दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा (Rakesh Omprakash Mehra) यांनी केले आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी यापूर्वी फरहान अख्तरसोबत भाग मिल्खा भाग हा एक अत्यंत यशस्वी आणि चांगला सिनेमा तयार केला आहे. तूफानची निर्मिती फरहान आणि राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी केली आहे.

अमेझॉनपाठोपाठ फरहान अख्तरनेही सिनेमाचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला. पोस्टरसोबत फरहानने लिहिले आहे, ‘तूफान हूं छोटे, तेरा मौसम बिगाड़ दूंगा. 12 मार्चला प्राईम व्हीडियोवर टीझर येणार आहे.’ खरे तर फरहान आणि राकेश मेहरा तूफान सिनेमा थिएटरमध्ये रिलीज करणा होते. कोरोनामुळे सिनेमाला उशीर झाला आणि आता तर बॉक्स ऑफिसवर डेट मिळणेही कठिण झाल्याने फरहान आणि राकेश ओमप्रकाश मेहराने ‘तूफान’ ओटीटीवर रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER