राज्यसभेत गुलाब नबी आझाद यांना निरोप; मोदी झाले भावूक

नवी दिल्ली :- संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session of Parliament) सुरूच आहे. अधिवेशनाचा पहिला टप्पा १५ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Gulab Nabi Azad) यांच्यासह राज्यसभेतील चार सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राज्यसभेत भाषण केले. यावर मोदी म्हणाले की, “गुलामजी जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा मी सुद्धा एका राज्याचा मुख्यमंत्री होतो.” तसेच मोदींनी आझाद यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. आझाद यांचे कौतुक करताना मोदी भावूक झाले.

पंतप्रधान म्हणाले की, “जम्मू काश्मीर आणि देशाच्या उपयोगीसाठी गुलाम नबी आझाद यांची गरज पडेल. जम्मू काश्मीरमध्ये मी अनेक वर्ष काम केले. पक्षाबरोबरच देशाची आणि संसदेचीही काळजी आझाद करायचे. ते देशाला प्राधान्य देणाऱ्या नेत्यांपैकी एक आहेत. एका बैठकीदरम्यान त्यांनी फोन केला आणि सांगितले की, सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक घ्या, ती मी घेतली. २८ वर्षांचा कार्यकाळ हा खूप मोठा असतो. मी गुलाम नबी यांच्या कामाचे आणि अनुभवाचे आदर करतो.” असे ते म्हणाले.

“गुलाम नबी आझाद यांच्यानंतर जो व्यक्ती हे पद सांभाळणार आहे. त्यांना गुलाम नबी यांच्या पावलावर पाऊल ठेवून मोठ्या आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे, याची चिंता मला आहे. देशासोबतच सदनाचीही काळजी घेणे ही लहान गोष्ट नाही. अन्यथा विरोधी नेत्याच्या रूपात प्रत्येकाला आपला दबदबा कायम ठेवण्याची इच्छा असते. हा मोह कुणालाही होऊ शकतो. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनाही मी याच श्रेणीत बघतो.” असेदेखील मोदी राज्यसभेत म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER