पुन्हा स्लिम फिट झाला फरदीन खान

फरदीन खानला (fardeen Khan) बॉलिवुडमध्ये (Bollywood) स्थापित करण्यासाठी पिता फिरोज खानने (Firoz Khan) प्रेम अगन चित्रपटाची निर्मिती केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काहीही करामत करू शकला नव्हता. त्यानंतर फरदीनला काही निर्मात्यांनी चित्रपटात घेतले. पिता फिरोज खाननेही फरदीनसाठी पुन्हा एकदा चित्रपट निर्मिती केली. पण फरदीनला यश काही मिळाले नाही. त्यामुळे नंतर त्याने चित्रपटसृष्टीकडे पाठ फिरवली. फरदीन खान दहा वर्षांपूर्वी म्हणजे 2010 मध्ये दूल्हा मिल गया चित्रपटात दिसला होता. त्यानंतर मात्र तो कधीही चित्रपटात किंवा चित्रपटांच्या पार्टीत दिसला नव्हता. मध्यंंतरी एका कार्यक्रमात तो आला असता त्याला ओळखता आले नव्हते इतका तो जाडा झाला होता. सोशल मीडियावरही त्याची प्रचंड टेर उडवली जात होती. फरदीन आता पुन्हा पूर्वीच्या शेपमध्ये येत नाही असाच कयास बॉलिवुडमध्ये बांधला जात होता. परंतु फरदीनने आपले वजन कमी केल्याचे नुकतेच दिसून आले.

दोन दिवसांपूर्वी कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरिया यांच्या कार्यालयात फरदीन खान आला होता. तेव्हा त्याला पाहून सगळेच चकित झाले होते. त्याचे बदलेले रुप पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले होते. सूत्रांनी सांगितले, फरदीन खान आता पुन्हा चित्रपटांमध्ये काम करण्याची तयारी करीत असून यासाठी तो निर्मात्यांच्या भेटी घेत आहे. सध्या फरदीन खान स्वतःच्या शरीराकडे प्रचंड लक्ष देत असून वजन कमी करण्यासोबतच शरीर सौष्ठवाकडेही तो लक्ष देऊ लागला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER