नाराज फॅन्स म्हणताहेत, ” बडी जल्दी बैकफूट पर आ गए आप भज्जी! “

Fans troll,Harbhajan even after Pangaa Video

नवी दिल्ली : कोरोनाशी लढाईत पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीच्या फाउंडेशनला मदत करण्याचे आवाहन केल्याने टीकेचे लक्ष्य झालेल्या हरभजनसिंगने नाराज फॅन्सना शांत करण्यासाठी एक व्हिडिओ व्टिटरवर शेअर केला आहे पण हरभजन व युवराजसिंगवर चाहते एवढे नाराज आहे की या व्हिडिओने नाराजी दूर करण्यापेक्षा आगीत तेल ओतण्याचेच काम केले आहे.

‘पंगा नही लेना…बुरा! अशा शिर्षकासह तिरंग्याच्या चिन्ह्यासह हरभजनने शेअर केलेला हा व्हिडिओ 19 जून 2010 रोजीचा आशिया कप स्पर्धेतील भारत- पाक सामन्यादरम्यानचा आहे. मात्र चाहत्यांनी हरभजनला ट्रोल करताना म्हटलेय की भज्जी.. तू जो काही मानसन्मान व प्रेम कमावले होते ते तर गमावलेच आहे शिवाय त्या तिरंग्याचे चिन्ह वापरण्याचा हक्कसुध्दा गमावला आहे. आता काहीही केले तरी जे नुकसान व्हायचे ते होऊन गेले आहे. ते भरुन निघणे शक्य नाही.

श्रीलंकेतील दांबूला येथील त्या सामन्यात भारताने एक चेंडू शिल्लक असताना तीन गडी राखून विजय मिळवला होता. या सामन्यात हरभजनची पाकिस्तानी शोएब अख्तरशी शाब्दिक चकमक झडली होती. त्यानंतर पुढल्याच चेंडूवर हरभजनने षटकार लगावून भारताला विजय मिळवून दिला होता.

भज्जीचा हा व्हिडीओ चाहत्यांची नाराजी मात्र दूर करु शकलेला नाही. चाहत्यांनी म्हटले आहे की , ‘अब कुछ नही होगा पाजी, डॅमेज हो चुका है”, “अपनी बनी बनाई इज्जत लूटा चुके हो तूम”, “कम से कम देश के सीआरपीएफ जवानों की शहादत तो याद कर लेते, बडे बेशर्म निकले”, “भाई इज्जत बनाने मे जिंदगी लग जाती है, गँवाने मे मिनीट”, ” बडी जल्दी बैकफूट पर आ गए आप भज्जी” असे चाहत्यांनी त्याला ट्रोल केले आहे.

शाहिद आफ्रिदीच्या फाउंडेशनला मदत करणाऱ्या युवराज व हरभजनवर चाहात्यांची टीका