सोनाक्षीच्या बिकीनी फोटोंवर फॅन्सचा प्रतिक्रियांचा पाऊस

Sonakshi Sinha

सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) अंग प्रदर्शनापासून दूरच असते. चित्रपटांमध्येही ती कधी अंग प्रदर्शन करताना दिसत नाही. तिचे वडिल अभिनेता शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांनाही मुलीने अंग प्रदर्शन केलेले आवडत नाही. त्यातच सोनाक्षी थोडी जाड असल्याने अंग प्रदर्शन तसेही तिला शोभणारे नव्हते. परंतु नंतर सोनाक्षीने स्वतःचे वजन बऱ्यापैकी कमी केले आणि ती सडपातळ झाली. सडपातळ झाल्यामुळेच ती आता बिकीनीवरील फोटो शेअर करू शकलेली आहे. तिच्या या फोटोंवर तिच्या फॅन्सनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे.

कोरोनामुळे (Corona) लादण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये (Lockdown) सर्वच जण घरी बसले होते. मात्र लॉकडाऊन उठल्यानंतर जेव्हा विमान प्रवासाची परवानगी देण्यात आली तेव्हा बॉलिवूडमधील बहुतेक सर्व कलाकारांनी मालदीव देशाकडे धाव घेतली होती. यात कॅटरीना कैफ, फरहान अख्तर, शिबानी दांडेकर, दिशा पटानी, टायगर श्रॉफ, तारा सुतारिया, रकुलप्रीत सिंह, एली अवराम इत्यादी कलाकारांचा समावेश होता. त्यापैकी काही कलाकार तेथे सुट्टी साजरी करून पुन्हा मुंबईला आले असून त्यांनी चित्रपटांच्या कामाला सुरुवातही केली आहे, सोनाक्षी सिन्हाही तिच्या मैत्रींणीसोबत मालदीवला सुट्टी साजरी करण्यासाठी गेली होती.

सोनाक्षीला बॉलिवूडमध्ये प्रवेश करून दहा वर्ष झाली आहेत. सोनाक्षीने 2010 मध्ये सलमान खानच्या नायिकेची भूमिका साकारत ‘दबंग’मधून रुपेरी पडद्यावर आगमन केले होते. प्रेक्षकांना ही जोडी चांगलीच आवडली होती. त्यानंतर ती पुन्हा 2019 मध्ये ‘दबंग 3’ मध्येही दिसली होती. सोनाक्षीचा अजय देवगणसोबतचा ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ लवकरच ओटीटी प्‍लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

सोनाक्षीने इंस्‍टाग्रामवर मालदीवमधील काही फोटो शेअर केले आहेत. मालदीवच्या समुद्र किनाऱ्याची सुंदरता आणि बिकीनीतील सोनाक्षीेचे अनोखे कॉम्बिनेशन प्रशंसकांना खूपच आवडलेले आहे. या फोटोंमध्ये सोनाक्षी खूपच आनंदीही दिसत आहे. कदाचित लॉकडाऊननंतर मोकळ्या हवेत श्वास घेतानाचा हा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत असावा. सोनाक्षीने स्वतःही पोस्टमध्ये याचा उल्लेख करीत स्वतःला बेटावरील मुलगी (आयलँड गर्ल) म्हणवून घेतले आहे. सोनाक्षी म्हणते, मला पाण्याची खूप आवड असूून पाण्यात असते तेव्हा मी सगळ्यात जास्त आनंदी असते.बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER