सोनू सूदच्या सिक्स पॅक अॅबवर फॅन्स फिदा

Maharashtra Today

सोनू सूदने (Sonu Sood) देशभरातील नागरिकांच्या मनात एक वेगळी आणि आदराची इमेज तयार केली आहे. कोरोना काळात देशभरातील गरीबांना सगळ्यात जास्त मदत कोणी केली असेल तर ती सोनू सूदने केली आहे. श्रमिकांना त्यांच्या घरी जाण्यासाठी वाहनाची सोय करणे असो वा एखाद्याच्या आई-वडिलांना वैद्यकीय मदतीची गरज असो, एखाद्या गावात रस्त्याची आवश्यकता असो प्रत्येक ठिकाणी सोनू सूद धावून गेला आहे आणि जात आहे. सोनूच्या या कामामुळे त्याला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. पण फॅन्सच्या मनात मिळालेले स्थान हा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे असे सोनू मानतो. सोनू सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय आहे. नुकताचे त्याने सोशल मीडियावर वर्कआउट करतानाचा एक फोटो टाकला आणि काही क्षणातच लाखोंनी त्याला लाईक्स केले. अर्थात सोनूचा हा फोटोही तसाच आहे.

बुधवारी सकाळी सोनूने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये सोनू जिममध्ये असल्याचे दिसत आहे. फोटोमध्ये जिममधील ट्रेड मिलवर फक्त शॉर्टसवर एका अंगावर झोपलेल्या सोनूचे सिक्स पॅक अॅब्स स्पष्टपणे दिसत आहेत. व्यायाम करून त्याने कमवलेले शरीर पाहून अनेकांना त्याचा हेवा वाटू लागला आहे. विशेष म्हणजे सोनू फक्त शाकाहारी आहे. सोनू अगोदर मांसाहार करायचा पण काही वर्षांपासून त्याने मांसाहार सोडून शाकाहाराचा स्वीकार केला आहे. शाकाहीर असतानाही सोनूने बॉडी मेंटेन केली आहे. सोनूने हा फोटो सोशल मीडियावर शेअर करताच दोन तासातच ६ लाखांपेक्षा जास्त लोकांनी तो फोटो लाईक केला. आतापर्यंत १५ लाखाच्या आसपास लोकांनी हा फोटो लाईक केला आहे. सगळे जण त्याच्या परफेक्ट बॉडीची प्रशंसा करताना दिसत आहे. काही फॅन्सनी आगीचा इमोजी शेअर केला आहे तर काही जणांनी सोनूपासून ही प्रेरणाही घेण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button