प्रभासच्या ‘राधे-श्याम’च्या प्री टीझरवर फॅन्सच्या उड्या

radhe shyam

‘बाहुबली’ सिनेमामुळे मेगा स्टार प्रभास संपूर्ण देशाला माहिती झाला होता. त्याच्या बाहुबलीच्या दोन्ही भागांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत कमाईचा विक्रम केला होता. त्यानंतर त्याचा ‘साहो’ आला होता. हा सिनेमा म्हणावा तसा चालला नाही. त्यानंतर आता प्रभास ओम राऊतच्या ‘आदिपुरुष’मुळे चर्चित झाला आहे. ‘आदिपुरुष’च्या अगोदर प्रभासने ‘राधे-श्याम’चीही घोषणा केली होती. या सिनेमात प्रभासचे वेगळेच रूप प्रेक्षकांसमोर येणार आहे. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. त्यामुळेच या सिनेमाचा एक प्री टीझर सोशल मीडियावर (Social Media) शेअर करण्यात आला असून त्यावर प्रशंसकांच्या उड्या पडल्या आहेत. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी म्हणजे १४ फेब्रुवारीला या सिनेमाचा पहिला ट्रेलर रिलीज केला जाणार आहे.

‘राधे-श्याम’च्या (Radhe-Shyam) निर्मात्यांनी रिलीज केलेल्या प्री टीझरमध्ये प्रभास ‘लव्हर बॉय’च्या रूपात  दिसत आहे. प्रभासचे हे रूप फॅन्सना प्रचंड आवडलेले आहे. टीझरची सुरुवात प्रभासच्या ब्लॉकबस्टर हिट ‘बाहुबली’ सिनेमातील लूकने होते. त्यानंतर साहोचा लूक समोर येतो आणि शेवटी स्नोफॉल होत असताना त्यातून चालताना प्रभास दिसतो. सगळे खूप आनंदी आणि प्रेमळ दिसते. टीझर शेअर करताना निर्मात्यांनी म्हटले आहे. ‘हा व्हॅलेंटाईन तुमच्या प्रेमाचा साक्षीदार बनेल. खूप वर्षांनंतर प्रभास लव्हर बॉयच्या रूपात दिसणार आहे. प्रभासने ‘डार्लिंग’ सिनेमात लव्हर बॉयची भूमिका साकारली होती. ‘राधे-श्याम’चे दिग्दर्शन राधाकृष्ण कुमार करीत असून गुलशन कुमार व टी सीरिज या सिनेमाची निर्मिती करीत आहे. या सिनेमात प्रभाससोबत पूजा हेगडे, सचिन खेडेकरही दिसणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER