अमिताभ बच्चन यांच्या दीर्घायुष्यासाठी चाहत्यांकडून देवाला साकडे

Amitabh Bachchan

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन, सून ऐश्वर्या आणि अभिषेक-ऐश्वर्या यांची कन्या आराध्या हिलाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. बच्चन पिता-पुत्रांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली. बच्चन कुटुंबातील इतर सदस्यांचीदेखील कोरोना चाचणी झाली. त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, बिग बी अमिताभ बच्चन यांच्या दीर्घायुष्यासाठी चाहत्यांकडून कांदिवलीमधील मिथिला हनुमान मंदिरात हवनपूजा करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER