संजय दत्तच्या नव्या लुकवर प्रशंसक फिदा

Sanjay Dutt

कॅन्सरवर मात करून पुन्हा एकदा चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त झालेल्या संजय दत्तचे (Sanjay Dutt) नवे लुक त्याच्या प्रशंसकांना खूपच आवडला आहे. त्याची नवी हेअर स्टाईल त्याला खूपच सूट होत असून तो अत्यंत आकर्षक दिसू लागला आहे. त्याची ही सुपर कूल हेयर स्टाइल सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

काही दिवसांपूर्वीच संजय दत्त हेयर स्टाइलिस्ट आलिम हकीमच्या सलूनमध्ये गेला होता. आलिमने संजय दत्तला नवा लुक देताना त्याच्या केसांची वेगळी स्टाईल करीत त्यांना ‘प्लॅटिनम ब्लॉन्ड’ रंग दिला. केसांचा रंग बदलल्याने संजय दत्त खूपच वेगळा आणि चांगला दिसू लागला आहे. आलिमनेच संजय दत्तचे हे नवे रूप सोशल मीडियावर शेअर केले आहे. आलिमने स्वतःही संजय दत्तबरोबर फोटो काढले असून ते फोटोही त्याने शेअर केले आहे. संजय दत्तच्या प्रशंसकांनी आलिमच्या पोस्टवर लाईक्सचा पाऊस पाडला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER