शर्टलेस आमिर खानच्या फोटोवर झाले फॅन्स फिदा

Aamir Khan

लाल सिंह चड्ढाचे (Lal Singh Chaddha) शूटिंग करणाऱ्या आमिर खानचे (Aamir Khan) दाढीधारी रुप सोशल मीडियावर लीक झाल्यानंतर त्याच्या या रुपाची प्रचंड चर्चा झाली होती. या रुपातील आमिर खान बुटका असल्याचेही सोशल मीडियावर दिसत होते. या फोटोंमुळेच आमिर खानच्या लाल सिंह चड्ढाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ निर्माण झाली. केवळ फोटोच नव्हे तर निवडून सिनेमा करण्यात आमिर वाकबगार असल्यानेही हॉलिवुडच्या सुपरहिट फॉरेस्ट गम्प सिनेमावर आधारित हा सिनेमा असल्याने तो कसा असेल याबाबतही फॅन्समध्ये उत्सुकता आहे. या सिनेमाचे शूटिंग आता जवळ जवळ संपले आहे. मात्र या शूटिंग दरम्यानच आमिर खानचे नवे रूप समोर आले आहे. हातात पाईप असलेल्या शर्टलेस आमिर खानचे हे नवे रुप त्याच्या फॅन्सना प्रचंड आवडले आहे.

काही वर्षांपूर्वी ‘गजनी’ सिनेमात आमिर खान शर्टलेस दिसला होता. त्यानंतर आता त्याचे शर्टलेस रूप समोर आले आहे. प्रख्यात फोटोग्राफर अविनाश गोवारीकरने आमिर खानचे हे रुप कॅमेऱ्यात कैद केले असून त्यानेच सोशल मीडियावरील त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आमिरचा हा नवा फोटो टाकला आहे. या फोटोमध्ये आमिर खान एका कोचवर बसलेला दिसत असून तो मागे वळून बघत आहे आणि त्याच्या हातात पाईपही दिसत आहे. या फोटोत आमिरची कमवलेली शरीरयष्टी स्पष्टपणे दिसत आहे. या फोटोत आमिर खान अत्यंत हँडसम दिसत आहे.

लाल सिंह चड्ढानंतर आमिर खान गुलशन कुमार यांच्या जीवनावर बनणाऱ्या ‘मुगल’ सिनेमाचे काम सुरु करणार आहे. खरे तर या सिनेमासाठी अगोदर अक्षयकुमारला घेण्यात आले होते. परंतु काही कारणांनी नंतर अक्षयच्या जागी आमिर खानला गुलशन कुमार यांच्या भूमिकेसाठी घेण्यात आले. या सिनेमाचे शूटिंग पुढील वर्षी जून महिन्यात सुरु केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय आमिर खान साऊथचा सुपरहिट सिनेमा विक्रम वेधाच्या हिंदी रिमेकमध्ये काम करणार आहे. या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन नीरज पांडे करणार आहे. या सिनेमात आमिर खान खलनायकाची भूमिका साकारणार असल्याचे सांगितले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER