हॉट हृतिक रोशनला एसी लावण्याचा फॅनचा सल्ला

Hrithik Roshan

हृतिक रोशन (Hrithik Roshan) बॉलिवूडमधील (Bollywood news) सगळ्यात हँडसम नायक आहे यात शंका नाही. करण जोहरने तर त्याला ग्रीक गॉडची उपमा दिली होती. एवढेच नव्हे तर जगातील सगळ्यात सुंदर नायकांमध्येही त्याचा अत्यंत वरचा क्रमांक आहे. अशा या हृतिक रोशनचे जगभरात फॅन्स पसरलेले आहेत. अशाच एका महिला फॅनने त्याचा हॉटपणा लक्षात घेऊन हॉटपणा कमी करण्यास एसी लाव असा सल्ला दिला. तेव्हा हृतिकनेही यस मॅडम म्हणत त्या महिला फॅनला उत्तर दिले. हृतिक आणि त्या महिलेची सोशल मिडियावरील पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. सोशल मीडियामुळेच कलाकार आणि त्यांच्या फॅन्सना एकमेकांशी बोलता येणे शक्य झाले असल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले.

ही महिला हृतिक रोशनची प्रचंड फॅन आहे. हृतिकचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट होतात. त्यामुळेच त्याच्याकडे विविध उत्पादनांच्या कंपन्यांनी ब्रॅन्ड अॅम्बेसडरपद सोपवले आहे. हृतिक ज्या उत्पादनांच्या जाहिराती करीत आहे त्या उत्पादनांची नावे घेऊन या महिलेने एक ट्विट केले. यावर एका कंपनीने हृतिकला मेसेज देताना ‘एवढ्या सगळ्या उत्पादनांच्या जाहिराती करतोस तर एसी सर्व्हिसही करून घे. असे म्हटले. यावर या महिला यूजरने हृतिकला टॅग करीत ‘हृतिक तुलाही एसी सर्व्हिस करून घ्यावी लागेल. कारण तू खूपच हॉट आहेस. असे म्हटले. या दोघांचा हा ट्विट संवाद सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER