रिषभ पंत शोधतोय घर, चाहत्याने दिला सल्ला, ”इंटरनॅशनल स्पेस स्टेशन पे घर ले लो स्पायडरमॅन’

ऑस्ट्रेलिया दौरा आपल्या फलंदाजीने गाजवलेला रिषभ पंत (Rishabh Pant) घर शोधतोय, त्यासाठी त्याने गुरुवारी दुपारी एक व्टिट केले आहे. त्यात त्याने म्हटलेय,

“जब से ऑस्ट्रेलिया से आया हूँ, घरवाले पिछे पडे है की नया घर ले लो अब. गुडगांव सही रहेगा? और कोई आॕप्शन है तो बताओ.”

रिषभसारख्या स्टार खेळाडूने असा सल्ला मागताच ट्विटरवर सल्ल्यांचा महापूर आला आहे. त्यात वेगवेगळी गावे सुचवणारे तर आहेतच पण काही भन्नाट सूचनाही आल्या आहेत. त्यात दीपक शर्मा यांनी म्हटलेय की, ‘रुक जा भाई कुछ दिन – POK (पाकव्याप्त काश्मीर) खाली होने वाला है’ . त्यावर प्रतिक्रियासुध्दा आली आहे की, ‘चीन, पाकिस्तान, नेपाल..तिनो एक साथ हलाल’. दुसरी एक भन्नाट सूचना आलीय की, ‘नेथन लियान से पुछ लो.’ रिषभच्या चाहत्या एका तरुणीने व्टिट केलेय की, मेरे दिल में तो रेंट फ्री रहते हो आपको घर की क्या जरुरत’.

अलोक रंजन नावाच्या चाहत्याने सल्ला दिलाय की, मनोज वाजपेयीजी..मदत करा.

@BajpayeeManoj jee help …कारण अभिनेता मनोज वाजपेयीने काही दिवसांपूर्वी व्टिट केले होते की, अपने ब्रांद्रा वाले घर के लिये बायर्स ढुंढ रहा हूँ. कोई हो तो बताना.

एकाने या निमित्ताने विराट कोहली व श्रेयस अय्यरवर निशाना साधताना म्हटलेय की, ‘विराट कोहली की बिल्डिंग में घर लेले भाई ,ऐसे ही श्रेयस अय्यर ने जगह बनाई है T20 और वनडे में’.

विक्रम साठ्ये नामक प्रशंसकाने तर अफलातून सल्ला दिलाय. त्याने म्हटलेय, ‘पुढील 10 वर्षात तुम्ही 250 दिवस क्रिकेट खेळणार. म्हणून कुटुंबासाठी ‘एअरफोर्स वन’ सारखे स्पेशल विमानच घेऊन टाका ज्यात बेडरुम असतील. सब जगह एअरपोर्ट में ही पार्किंग मिलेगी.’ दुसऱ्या एकाने त्याच्या स्पायडर मॕन टोपणनावाच्या संदर्भाने म्हटलेय, ‘इंटरनॕशनल स्पेस स्टेशन पे घर ले लो स्पायडरमॕन’. एकाने म्हटलेय की ब्रिस्बेनच्या गब्बा मैदानाचा ताबा मिळाला तर बढिया होईल’.

याप्रकारे आज दिवसभर रिषभ ट्रेंडिंगमध्ये आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER