प्रसिद्ध गायिका वैशाली माडे राष्ट्रवादीत; उद्या घड्याळ बांधणार

Vaishali Mhade - NCP - Maharashtra Today

मुंबई :- सध्या चित्रपटविश्वातील अनेक कलाकार राजकीय क्षेत्रात उतरत आहेत. अलीकडेच पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (West Bengal Assembly Election) पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेता मिथुन चक्रवर्तीने (Mithun Chakraborty) भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला आहे. त्यानंतर आता ‘झी’च्या ‘सारेगमप’ हिंदी आणि मराठी स्पर्धेच्या विजेत्या आणि मराठी चित्रपटविश्वातील प्रसिद्ध गायिका वैशाली माडे उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे. याबाबतची माहिती चित्रपट, कला, साहित्य, सांस्कृतिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी दिली.

पक्षप्रवेश झाल्यानंतर वैशाली माडे यांच्याकडे पक्षातील कोणती जबाबदारी देणार याबाबतचा निर्णय झाला नसल्याची माहितीही पाटील यांनी दिली. उद्या मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे बडे नेतेही उपस्थित राहणार असून दुपारी १२ वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button