एका सुरेल पर्वाचा अस्त; प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचं निधन

S. P Balasubrahmanyam

चेन्नई : मनोरंजन विश्वासाठी आणखी एक धक्कादायक बातमी आहे. अलौकिक आवाजाने रसिकांवर मोहिनी घालणारे प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम (S. P. Balasubrahmanyam) यांनी जगाचा निरोप घेतला आहे. गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर चेन्नईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू होते.

मात्र गेल्या २४ तासांत त्यांची प्रकृती नाजूक झाली होती. बालसुब्रमण्यम यांना कोरोनाची लागण झाल्याने ५ ऑगस्ट रोजी चेन्नईच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती समजल्यानंतर अभिनेता कमल हसन एमजीएम रुग्णालयात गेले. काही दिवसांपूर्वी बालसुब्रमण्यम यांनी व्हिडीओ जारी केला होता आणि आपण बरं असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER