प्रसिद्ध संगीतकार राम लक्ष्मण जोडीमधील लक्ष्मण विजय पाटील यांचे नागपूर येथे निधन

Maharashtra Today

नागपूर : नागपुरचे सुपूत्र आणि संगीतकार राम-लक्ष्मण जोडीतील(Ram Laxman duo) संगीतकार लक्ष्मण उपाख्य विजय पाटील(Laxman Vijay Patil ) यांचे नागपूर(Nagpur) येथे मुलाकडे निधन(Pass Away) झाले. ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी शोभा पाटील, मुलगा संगीतकार अमर पाटील, सूना, नातवंडे, दोन मुली असा आप्त परिवार आहे. राम कदम उपाख्य राम व विजय पाटील उपाख्य लक्ष्मण अशी राम-लक्ष्मण ही जोडी होती. राजश्री फिल्मसच्या ‘एजंट विनोद’(Agent Vinod) हा या जोडीचा पहिला चित्रपट. १९७६ साली आपले जोडीदार राम यांच्या मृत्यू नंतरही लक्ष्मण यांनी राम-लक्ष्मण याच नावाने संगीत दिले. मराठीत दादा कोंडके यांच्या चित्रपटांचे संगीतकार म्हणून ते खूप गाजले. आजपर्यत त्यांनी सुमारे ७५ हिंदी, मराठी व भाेजपुरी चित्रपटांना संगीत दिले आहे.

लक्ष्मण उपाख्य विजय पाटील यांची सुरूवात नागपुरातील गाजलेल्या कादर आॅर्केस्ट्रातून झाली. एम. ए. कादर हे त्यांचे बालमित्र. बाबा स्वामी, एम. ए. कादर व विजय पाटील हे तिघे आॅर्केस्ट्रात गायचे. काही वर्षांनी ते मुंबईला निघून गेले. त्यांच्या जाण्याने एक हृदयस्थ मित्र गमावला, अशी शोकसंवेदना कादर यांनी व्यक्त केली. एकदा झालेली मैत्री ते शेवटपर्यत जपत. त्यांनीच मला अंतिम न्याय व फौज या चित्रपटात पार्श्वगायनाची संधी दिली. कादर संगीत अकादमीचे उद्घाटन आम्ही त्यांच्या हस्ते केले होते, अशी आठवण कादर यांनी सांगितली.

हिंदीत ‘हम से बढकर कौन’, ‘सुन सजना’, ‘दिवाना तेरे नाम का’, ‘पोलिस पब्लिक’, ‘हंड्रेड डेज’, ‘दिल की बाजी’ ‘पत्थर के फुल’ आदी चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. इथपर्यत उषा मंगेशकर यांच्याकडून त्यांनी गाणी गाऊन घेतली. १९८९ च्या ‘मैने प्यार किया’ या सलमान माधुरी दीक्षित अभिनीत चित्रपटाने त्यांना अमाप यश आणि नाव दिले. यासाठी त्यांना फिल्म फेअर पारितोषिक मिळाले. त्यानंतरचे ‘हम आप के है कौन’ व ‘हम साथ साथ है’ हे चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button