सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक खय्याम यांचे निधन

Mohammad Zahoor Khayyam

मुंबई :- अनेक चित्रपटांतील गाण्यांना संगीत देणारे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक मोहम्मद जहूर खय्याम यांचे वयाच्या 92व्या वर्षी सोमवारी निधन झाले. दीर्घकाळापासून ते फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांना जुहूच्या सुजॉय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र येथे त्यांची आज प्राणज्योत मावळली. 1953 ते 1990 या कालावधीत त्यांनी अनेक चित्रपटांना संगीत दिले.

1958 साली खय्याम यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘फिर सुबह होगी’ या चित्रपटाची गाणी कमालीची लोकप्रिय झाली होती. तथापि, त्यांनी 1947 साली आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी कभी कभी, उमराव जान, फिर सुबह होगी अशा सुपरडुपर हिट चित्रपटांना त्यांना संगीत दिले. कभी कभी व उमराव जान या दोन चित्रपटांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.