सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचे निधन

Narendra Bhide

पुणे : आंतरारष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेले मराठमोळे संगीतकार नरेंद्र भिडे यांचं आज 10 डिसेंबर रोजी पहाटे हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं, ते 47 वर्षांचे होते. त्यांचं अंत्यदर्शन सकाळी 9 वाजून 30 मिनिटाला डॉन स्टुडिओ येथे ठेवण्यात येणार आहे. तर 11 वाजता वैकुंठधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. सकाळी अकरा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. भिडे यांच्या पाश्चात आई ,वडील , पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

सिव्हिल इंजिनीयरची पदवी घेतलेल्या नरेंद्र भिडे (Narendra Bhide) यांनी अनेक नाटके, मालिका, मराठी चित्रपट संगीतबद्ध केले आहेत. त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण उस्ताद महंमद हुसेन खान साहेब, स्वरराज छोटा गंधर्व, बाळासाहेब मते, शैला दातार, सुधीर दातार, सुहास दातार यांच्याकडे तर पाश्चिमात्य संगीताचे शिक्षण हेमंत गोडबोले यांच्याकडे घेतले. आपल्या संगीतातून शास्त्रीय व आधुनिक बाजाच्या सुरांची गुंफण करत आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी कौशल्या दाखवलं. त्यांनी अनेक नाटक, मालिका, चित्रपट, जिंगल्सच्या माध्यमातून संगीतक्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांना झी गौरव (पाच वेळा), सह्याद्री सिने अवॉर्ड, राज्य नाट्य पुरस्कार ( दोन वेळा), व्ही शांताराम पुरस्कार, श्रीकांत ठाकरे पुरस्कार, म. टा. सन्मान, राज्य चित्रपट पुरस्कार आदि विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER