प्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचे निधन

Famous astrologer Bejan Daruwala passed away

मुंबई :- विख्यात ज्योतिषी बेजान दारूवाला (९०) यांचे आज (२९ मे रोजी) अहमदाबाद येथील रुग्णालयात निधन झाले. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी ट्विट करून दारूवाला यांना श्रद्धांजली अर्पण केली. श्वास घेण्यास त्रास होत होता.  त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. काही प्रसारमाध्यमांनी दारूवाला यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त दिले होते; पण त्यांचा मुलगा नास्तूर दारूवाला याने बेजान दारूवाला यांना कोरोना झाल्याचे वृत्त फेटाळले आहे.

गुजरातमध्ये जन्म

बेजान दारूवाला यांचा जन्म ११ जुलै १९३१ रोजी अहमदाबाद येथे पारसी परिवारात झाला होता. त्यांचे वडील मिलमध्ये काम करत होते. दारूवाला यांचे प्राथमिक शिक्षण अहमदाबादमध्येच झाले. ते प्रोफेसर होते. देशातील अनेक टीव्ही चॅनल्स आणि वृत्तपत्रात त्यांनी सांगितलेले भविष्य प्रसारित होत होते.

मोदींच्या विजयाची भविष्यवाणी

बेजान दारूवाला यांनी २५ एप्रिल २००३ रोजी ज्योतिष वेबसाईटचा शुभारंभ मुंबईतील ताज हॉटेलमध्ये केला होता. त्यानंतर त्यांनी जोतिषी सेवेची सुरुवात आपल्या वेबसाईटवरून केली. त्यांच्या वेबसाईटचे नाव ‘बेजानदारूवालाडॉटकॉम’ असे आहे. बेजान दारूवाला यांनी संजय गांधी यांचं निधन आणि २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या विजयाबाबत अचूक भविष्यवाणी केली होती, हे उल्लेखनीय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER