विनापरवानगी नवी मुंबईवरून कुटुंब परतले, पाच जणांवर गुन्हा दाखल

गुन्हा दाखल

औरंगाबाद : काेराेनाचा कहर सुरू असताना पोलिस परवानगी न घेता नवी मुंबईवरून दाेन कुटुंब शहरात परतले. हा प्रकार कळताच पाेलिसांनी पाचही जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पाेलिस निरीक्षक अशोक गिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईत दाेन महिन्यांपासून वास्तव्यास असलेले दाेन कुटुंब २१ मे राेजी शहरातील रायगडनगरमध्ये परतले. येण्यापूर्वी त्यांनी ना पाेलिसांची परवानगी घेतली ना डाॅक्टरांकडून फिटनेस प्रमाणपत्र. हे सर्व नियम गुंडाळून हे कुटुंब अाले. पाेलिसांनी त्यांच्या घरी जाऊन खात्री केली. या प्रकरणी विजय मिलिंद पारधे (२५), संगीता मिलिंद पारधे (४५), काजल मिलिंद पारधे (२२), चंद्रभागा विठ्ठल साळवे (६५) आणि सुनील विठ्ठल साळवे (४०) यांच्यावर गुन्हे दाखल केले.

पाेलिसांच्या सीमाबंदीतून वाट कशी निघाली?
नवी मुंबईहून औरंगाबादला येताना पुणे व नगर हे जिल्हे ओलांडून यावे लागते. सुमारे ३५० किमीहून जास्त अंतर अाहे. सध्या सर्वच जिल्ह्यांच्या सीमा सील आहेत. परवानगीशिवाय काेणालाही साेडले जात नाही. मग नवी मुंबई, पुणे, नगर व औरंगाबाद या चार जिल्ह्यांच्या सीमेवरुन हे कुटुंब कुठलाही पास नसताना कसे आले? असा प्रश्नही उपस्थित हाेत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला