ब्रह्मदत्त सैनी यांनी केली कुत्र्याची तेरावी !

DOG

मुजफ्फरनगर : परिसरातील अल्मासपुर येथील डॉ. ब्रह्मदत्त सैनी यांनी त्यांच्या ‘कालू’ या कुत्र्याची तेरावी १८ जानेवारीला केली! या तेरावीच्या कार्यक्रमात त्यांच्या परिवारासोबत नातेवाईक आणि मित्र असे हजारावर लोक हजर होते. कालूच्या तेरावीच्या पत्रिका छापून सर्वांना निमंत्रण देण्यात आले होते. याबाबत डॉ. ब्रह्मदत्त म्हणतात – कालू आमच्यासाठी कुटुंबातला सदस्य होता. आमच्या नातेवाईकासाठी आम्ही जे केले असते ते कालूसाठी केले.

शिर्डीत बंद तर परभणीत ‘सद्बुद्धी दे’ कीर्तन

१४ वर्षांपूर्वी मी अतिशय आर्थिक अडचणीत होतो. त्यावेळी मी कालूला घरी आणले तो घरात आला आणि आमचे दिवस पालटले. सर्व प्रश्न मिटले. त्याचा पायगुण आमच्यासाठी अतिशय चांगला ठरला. म्हातारा झाल्याने कालू आजारी पडला. आम्ही त्याच्यावर मुजफ्फरनगर येथे पशु चिकित्सालयात उपचार केले पण तो वाचला नाही. कालू मेल्यानंतर सैनी परिवाराने त्याच्यावर जंगलात नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत विधिवत अंत्यसंस्कार केले.