जवायाला मारहाण

Beating

औरंगाबाद : पत्नीला सासरी घेण्यासाठी आलेल्या जवायाला सासरकडच्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना ५ नोव्हेंबर रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारस हर्सुल परिसरात घडली. प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, हिरामन कृष्णा खोतकर (२८, रा. फकीरवाडी कोलठाण वाडी, हर्सुल) याची पत्नी उज्वला ही रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने हिरामन हा पत्नीला घेण्यासाठी सासुरवाडीत गेला.

तेथे संशयीत आरोपी सिद्धार्थ वाघ, राजु शेळके यांनी तु उज्वलाला विनाकारण शिवीगाळ करतो म्हणत शिवीगाळ करुन लोखंडी पाईपने जबर माराहण केली. प्रकरणात हर्सुल पोलिस ठाण्यात गुन्हा दालख करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार सौन्ने करित आहेत.