ऐतिहासिक गाणे ‘ए मेरे वतन के लोगों’ बद्दल चूक ट्विट; विशाल ददलानी झाला ट्रोल

Vishal Dadlani

मुंबई :- लता मंगेशकर यांनी गायलेल्या ‘ए मेरे वतन के लोगों’ या ऐतिहासिक देशभक्तिपर गीताबाबत बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध गायक- संगीतकार विशाल ददलानी याने चूक संदर्भ दिल्याबद्दल त्याचे ट्रोलिंग सुरू आहे. छोट्या पडद्यावरील इंडियन आयडॉल या कार्यक्रमात विशालने दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्याविषयी चूक माहिती दिली.

इंडियन आयडॉल या कार्यक्रमात एका स्पर्धकाने ‘ऐ मेरे वतन के लोगों’ हे गाणे सादर केले. गाणं ऐकल्यानंतर विशालने या स्पर्धकाचं कौतुक केलं. तिला या गाण्यामागचा इतिहास सांगताना – ‘ए मेरे वतन के लोगों’ हे गाणं गायिका लता मंगेशकर यांनी १९४७ मध्ये पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासमोर गायलं होतं, असे म्हणाला. यावर नेटीजन्सने त्याला ट्रोल केले. अनेकांनी त्याला इतिहासाची नीट माहिती घेण्याचा सल्ला दिला आहे. चुकीचा इतिहास सांगणाऱ्या व्यक्तीला परीक्षक म्हणून हटवा, असे काहींनी म्हटले. यानंतर विशाल ददलानीने माफी मागत दिलगिरी व्यक्त केली आहे.

इतिहास
१९६२ मध्ये भारत-चीन युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या स्मरणार्थ लता मंगेशकर यांनी हे गाणं गायलं होतं. कवी प्रदीप यांनी हे गाणं लिहिलं असून सी. रामचंद्र यांनी त्याला संगीत दिलं आहे. लता मंगेशकर यांनी २६ जानेवारी १९६३ रोजी दिल्ली येथे हे गाणं गायलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER